Modi On Balasaheb Thackeray । लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये देशाचा पंतप्रधान निवडण्यासाठी महत्वपूर्ण बैठक पार पडत आहे. यावेळी नरेंद्र मोदी यांना एनडीएचे नेते म्हणून प्रसवते मांडण्यात आला. तसेच एडीएतील घटक पक्षाने या प्रस्तवाला समर्थन दिले. दरम्यान, यावेळी पंतप्रधान मोदींनी भाषण करताना सर्व घटकपक्षाचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आपल्या भाषण उल्लेख केला.
नवनिर्वाचित लोकसभा सदस्यांचे अभिनंदन Modi On Balasaheb Thackeray ।
नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या बैठकीत भाषण केले. त्यांनी नवनिर्वाचित लोकसभा सदस्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, विजयी होऊन आलेले सर्वजन अभिनंदनास पात्र आहेत. पण देशातील लाखो कार्यकर्त्यांनी दिवस-रात्र काहीही पाहिले नाही. गर्मी पाहिली नाही. देशातील अनेक कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली. मी संसदेच्या सेन्ट्रल हॉलमधून मी त्यांचे आभार मानतो. एनडीएचा नेता म्हणून माझी तुम्ही सर्वसंमतीने निवड केली. या निवडीमुळे मला नवी जबाबदारी मिळाली आहे.
#WATCH | At the NDA Parliamentary Party meeting, Prime Minister Narendra Modi says “NDA has always given a corruption-free, reform-oriented stable government to the country. Congress-led UPA changed their name but they have been known for their corruption. Even after changing… pic.twitter.com/QZTP49xUEk
— ANI (@ANI) June 7, 2024
नरेंद्र मोदी यांनी घेतलं बाळासाहेब ठाकरे यांच नाव Modi On Balasaheb Thackeray ।
पुढे बोलताना,”एडीए आघाडी ही राष्ट्रप्रथम या भावनेतून तयार झालेली आहे. भारताच्या राजकीय पटलावर ही एक ऑरगॅनिक युती आहे. आज अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे, जॉर्ज फर्नांडिस, शरद यादव या अनेकांची मी नावं घेऊ शकतो. त्यांनी जे बीज रुजवलं होतं, त्या बिजाला पाणी घालून जनतेने त्या बिजाचा वटवृक्ष केलं आहे.गेल्या दहा वर्षांत एनडीच्या जुन्याच मूल्यांना घेऊन पुढे जाण्याचा, देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे.” असे त्यांनी म्हटले.