नवी दिल्ली – नव्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची भेट घेतली. त्या भेटीत मोदी यांनी मुर्मू यांचे अभिनंदन केले. त्यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा हेही उपस्थित होते.
मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीनंतर मुर्मू यांचा विजय निश्चित झाला. त्यांनी एकूण मतमुल्यापैकी 50 टक्के मतमुल्याचा पल्ला पार केला. त्यानंतर मुर्मू राहत असलेल्या तात्पुरत्या निवासस्थानी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी मोदी दाखल झाले.