`मोदी है तो मुमकीन है` – माईक पॉम्पेओ

भारताबरोबर द्विपक्षीय संबंध सुधारण्यावर दिला भर

वॉशिंग्टन – “मोदी है तो मुमकीन है’ ही निवडणुकीच्या काळातील भाजपची लोकप्रिय घोषणा आता अमेरिकेचे पररष्ट्र मंत्री माईक पॉम्पेओ यांनीही दिली आहे. भारताबरोबरचे द्विपक्षीय संबंधांमध्ये अधिक प्रगती करण्यावर त्यांनी भर दिला आहे. अमेरिकेतील ट्रम्प आणि मोदी प्रशासनाला हे द्विपक्षीय संबंध सुधारण्याची अद्वितीय संधी लाभली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. बुधवारी झालेल्या अमेरिका- भारत व्यापारी परिषदेदरम्यान ते बोलत होते.

मोदींच्या फेरनिवडीबाबत आश्‍चर्य नाही
मोदींची भारताच्या पंतप्रधानपदी फेरनिवड होईल, हे आपल्याला माहिती होते. मोदींना मिळालेल्या प्रचंड बहुमताचे अनेक विश्‍लेषकांना आश्‍चर्य वाटले. पण सार्वत्रिक निवडणुकीत त्यांना मिळालेल्या प्रचंड बहुमताबाबत आपल्याला आश्‍चर्य वाटले नाही. आपण स्वतः आपल्या सहकाऱ्यांसह निवडणुकीचे काळजीपूर्वक अवलोकन करत होतो. सामान्य चहा विक्रेत्यापासून सलग 13 वर्षे एका राज्याचे सरकार चालवणारे मोदी हे भारतातील नव्या पद्धतीचे नेते आहेत, असल्याची खात्री आपल्याला पटली होती, अशा शब्दात पॉम्पेओ यांनी मोदींचे कौतुक केले.

“मोदी है तो मुमकीन है’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी अलिकडच्या काळातील प्रचारदरम्यान म्हणाले होते. आता आमच्या लोकांमधील प्रगती किती शक्‍य होती आहे, ते आपल्याला पहायचे आहे, अशा शब्दांमध्ये पॉम्पियो यांनी भारताच्या भावी धोरणांबाबतच्या अपेक्षा व्यक्‍त केल्या. या महिन्याच्या अखेरीस पॉम्पेओ भारतदौऱ्यावर येत असून पंतप्रधान मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी ते चर्चा करणार आहेत. यावेळी द्विपक्षीय संबंधांमधील प्रगतीसाठीच्या महत्वाच्या मुद्दयांवर माईक पॉम्पेओ यांनी भर दिला.

ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखाली अमेरिकेने संरक्षण सहकार्याची व्याप्ती वाढवली आहे. भारत-प्रशांत भागातील सामायिक मुद्दे सक्षम केले आणि पाकिस्तानकडून दहशतवादाला अमान्य करण्याविरोधात कठोर भूमिकाही घेतली आहे. गेल्या वर्षी भारत अमेरिकेदरम्यान संरक्षण विभागाच्या “2+2’चर्चेला सुरुवात केली गेली. भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यासारख्या समविचारी लोकशाही देशांमधील “क्‍वाड डायलॉग’ पुन्हा सशक्‍त केले गा आहे.ही एक चांगली सुरुवात आहे. आता हे विशेष भागीदारीचे संबंध यापुढे नेण्याची अद्वितीय संदी ट्रम्प आणि मोदी प्रशासनाला लाभली आहे, असे पॉम्पेओ म्हणाले. भारतामध्ये “5 जी’ कम्युनिकेशन नेटवर्क सुरू करायला भारताला मदतीस अमेरिका उत्सुक असल्याचेही त्यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)