मोदी इज नॉट फेकू… मोदी इज उखाडफेकू

शंकर दुपारगुडे
कोपरगाव – गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपून निकाल ही जाहीर झाले. भाजप व मित्रपक्षांनी निर्विवाद बहुमत मिळवून पुन्हा एकदा सत्ता काबीज केली. कॉंग्रेस भुईसपाट केली. याबाबत विविध कोट्या, विनोद, कोपरखळ्या, चिमटे, हास्याचे फवारे उडतील, असे व्यंगचित्रे सोशल मीडियावर टाकल्याने अनेकांची त्यातून चांगलीच करमणूक झाली.

त्यातील एकमात्र 1997 साली माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार एका मताने पडले होते. त्यावेळी कॉंग्रेस सरकार त्यांच्यावर हसत होते. त्यावेळी वाजपेयी यांनी भविष्यवाणी केली होती एक दिवस आमचे देशात पूर्ण बहुमताचे सरकार येईल. त्यावेळी पूर्ण देश कॉंग्रेसला हसत राहील, असा मेसेज फिरत होता. त्यामुळे सोशल मीडियावर देखील भावनिक वातावरण तयार झाले. सोशल मीडियावर आलेल्या सर्वांत जास्त खिल्ली मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उडवली. त्यांच्यावर व त्यांनी केलेली लाव रे तो व्हिडिओची आरोळी फोल ठरली. ठाकरे यांनी जिथे जिथे सभा घेतल्या त्या सर्व जागांवर युतीचे उमेदवार निवडणून आले. कृष्णकुंजमधून राज ठाकरे आघाडीवर, आता तर टीव्ही पण हॅक झाला वाटते. रिमोटचे कुठलेही बटन दाबले, तरी भाजपच आघाडीवर दिसतंय…

सर्वांत मोठी ब्रेकिंग न्यूज राज ठाकरे यांनी आदेश काढला बंद कर रे तो व्हिडीओ, तर मै शरदचंद्र गोविंदराव पवार, ईश्‍वर की शपथ लेता हू, तेव्हड्यात सुप्रियाताई येतात अहो बाबा, उठा झोपेत का बडबडता. तो राज ठाकरे आलाय सभांचे राहिलेले पैसे मागायला. मोदी इज नॉट फेकू… मोदी इज उखाडफेकू. सर्व डॉक्‍टर आघाडीवर त्यात डॉ. अमोल कोल्हे, डॉ. हीना गावित, डॉ. सुजय विखे पाटील, डॉ. प्रीतम मुंडे, डॉ. सुभाष भामरे, तर फक्त दोनच येतील ते सुधा आले तर, स्वतःच्या नातवाला जिंकावता येईना, चालले दुसऱ्याच्या नातवाला हरवायला. प्रवरा पॅटर्न लई हटके… तर ईव्हीएमचा अर्थ एव्हरी वन व्होटेड मोदी.

मोदी शहा यांना म्हणत आहे उरलेली मत मोजणी करायची की सरळ शपथविधी करायचे, हे व्यंग चित्र .. पारले जीच्या चित्राच्या जागी राहुल गांधी यांचे चित्र टाकून हरले जी, तर शान चित्रपटातील यम्मा यम्मा गाण्यावर मोदी शहाची व्यंग चित्रफीत सर्वांची आकर्षण ठरले. तर सनी देओल इतने आगे बढ गये की पाकिस्तान मे चले गये… शत्रुघ्न सिन्हा पाटण्यातून, तर त्यांची बायको लखनऊमधून पराभूत. दोनो एक साथ खामोश… ब्रेकिंग न्यूज दिल्ली के मुख्यमंत्री का बडा बयान, जनता मोदी से मिली हुई है. नागरिकशास्त्रात हे शिकलो होतो सगळे खासदार मिळून पंतप्रधान बनवतात, पण 2019 मध्ये एका पंतप्रधानाने सर्व खासदार बनवले.

यमराज– आपका समय समाप्त हुवा. आपकी कोई अंतिम इच्छा. मनुष्य… कॉंग्रेस की सरकार देखणी है. त्यावर यमराज म्हणतात चालाक प्राणी, अमर होना चाहता है क्‍या. चितळेच्या दुकाना बहेरील पाटी अब की बार मोदी सरकार, तरीही दुकान बंद राहील एक ते चार… हे राज टीव्ही फोड रे.. तुझ्या सभा फेल गेल्या खळ खट्याक, तर चाललो भो मी इटलीला मामाकडे… मावळमध्ये पार्थ पवार पुढे, अजित दादा दांडा घेऊन त्यांच्या मागे, राहुल गांधी का नया बयान ये 2014 की पेटीया खोल रहे है, तर पंजा चित्र असलेल्या फोटोला अंतिम श्रद्धांजली, गांधी परिवार कमळ फुलताना पाहताना चित्र, देश का दिल चुराया, चौकीदार चोर है अशा एक ना एक कोट्या सर्वांचेच मनोरंजन करून गेल्या. त्याचाच बोलबाला दिसून आला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×