मोदी चौकीदार है, बाकी सब भागीदार है : आठवले

नगर – नरेंद्र मोदीजी अंगार है, बाकी सब भंगार है. नरेंद्र मोदीजी चौकिदार है, बाकी सब भागीदार है यासारख्या कविता केंद्रीय सामाजिक मंत्री रामदास आठवले यावेळी सादर करून नगरकरांची दाद मिळविली. भाजपचे उमेदवार डॉ.सुजय विखे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेपूर्वी आठवले बोलत होते. ते म्हणाले, डॉ. सुजय विखे तरूण आहे. मी सारखा विचार करत होतो. मी त्यांना सोडून इकडे आलोय. तुम्ही तिकडे काय करता. सुजयने अतिशय चांगला निर्णय घेतला. अन तो भाजपात आला. मागच्या वेळेस मी शिर्डीत पडलो. पडलो पण लगेच उभा राहिलो. एकटाच नाही पडलो त्यांना सुध्दा पाडले.

बाळासाहेब विखे पाटील मला दिल्लीत भेटायचे. ते मला म्हणायचे तुम्ही शिर्डीत या. मी त्यांना म्हणायचो तुम्ही तिथे जा. पण त्यांना नगरची जागा दिली नाही. त्यामुळे ते नाराज झाले. त्यामुळे दोन्ही जागांवर आघाडीचा पराभव झाला. आता मला तिकिट काही मिळाले नाही. म्हणून मी नाराज होतो. पण नाराज होऊन जायचे कुठे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी खायलाच महाग आहेत. मी तिकडूनच आलोय. त्यामुळे इथचं थांबू म्हटलं. मला माहिती आहे कुठून अन कसं मिळवायचं, असेही आठवले म्हणाले. सुरवातीलाच आठवले यांनी येथील निवडणूकीवर शिग्रकविता केली. संग्राम जगताप इथे पडणार आहेत फिके, आणि निवडून येणार आहेत सुजय विखे… आता हे लोक राहिले नाहीत मुके, मग का निवडून येणार सुजय विखे… याला मोठा प्रतिसाद मिळाला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.