मोदी मोठे हुकूमशहा तर केसीआर लहान हुकूमशहा – काँग्रेस नेते 

नवी दिल्ली – काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना मोठे हुकूमशहा आणि छोटा हुकूमशहा असे संबोधले आहे. तसेच त्यांच्यावर टीका करणाऱ्या विरोधात सीबीआय आणि ईडी सारख्या संस्थांना लावण्यात येते, असा आरोपही गुलाम नबी आझाद यांनी केला आहे. एका प्रचारसभेदरम्यान ते बोलत होते.

गुलाम नबी आझाद म्हणाले कि, देशात कोणतीही लोकशाही राहिलेली नाही. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली तर सीबीआय सारख्या संस्था त्याच्याविरोधात खोटा गुन्हा दाखल करेल. ते पुढे म्हणाले, केसीआर तेलंगणाचे छोटे हुकूमशहा आहेत तर मोदी मोठे हुकूमशहा आहेत, असेही ते म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.