मोदींनी पक्षातल्या ज्येष्ठांचा अवमान केला – केजरीवाल

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आडवाणी, मुरलीमनोहर जोशी यांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्यांचा अवमान केला असा आरोप आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. मोदींची ही वर्तणूक हिंदु धर्मानुसार नाही कारण आपल्या धर्मात ज्येष्ठांचा आदर करायला शिकवले जाते असे ते म्हणाले.

आडवाणी, जोशी, सुषमा यांच्या सारख्या ज्येष्ठांना मोदी अशी वागणूक कशी काय देऊ शकतात असा सवाल त्यांनी ट्‌विटरवर उपस्थित केला आहे. ज्यांनी भाजपचे घर बांधले त्यांनाच घराबाहेर घालवून दिले आहे. वास्तविक आपल्या घरातील ज्येष्ठांना मोदींनीच आधार देण्याची गरज असताना त्यांनी त्यांना अशी अवमानकारक वागणूक देऊन ते आता कोणाचे समर्थन करीत आहेत असा सवालही केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.