जगभरातील माध्यमांमध्ये मोदीच; पाकची निराशा 

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीची मतमोजणी अद्यापही चालू आहे. एनडीएची वाटचाल मोठ्या विजयाकडे सुरु आहे. मतमोजणीदरम्यान अनेक देशांमध्ये सध्या रात्र आहे. तरीही तेथील माध्यमे लाईव्ह अपडेट्स देत आहेत. ब्रिटिश वृत्तपत्र द गार्डियनने लिहले कि, मोदींच्या भाजपने पुन्हा एकदा कमाल केली आहे. ते ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल करत आहेत. तर पाकिस्तानचे द डॉन वृत्तपत्राने लिहले कि, मोदींचा हा विजय पाकिस्तानविरोधी नीतींवर मोहर आहे.

द गार्डियनने लिहले कि, एक्झिट पोलमधील अंदाज खरे ठरत आहे. मोदींची भाजप सत्तेत वापसी करण्यासाठी तयार आहे. त्यांना थांबविण्याचे अनेक प्रयत्न झाले. परंतु, जनतेनं नेत्यावर आणि पक्षावर विश्वास ठेवला.

न्यूयॉर्क टाइम्सने म्हंटले कि, मोदींच्या विजयाचा अर्थ आहे कि भारतीय जनता सध्या त्यांच्याशिवाय दुसऱ्या नेतृत्वाला संधी देऊ इच्छित नाही. ते हिंदू राष्ट्रवादाचे प्रतीक आहेत. त्यांनी जगभरात देशाची भक्कम प्रतिमा उभी केली आहे. आणि त्यांनी करप्रणालीत बदल घडवून आणला.

पाकिस्तानच्या द डॉन वृत्तपत्राने लिहले कि, मोदी विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. याचा अर्थ पाकिस्तानप्रती भाजपचा नीतींमध्ये कोणताही बदल होणार नाही. आणि दोन्ही देशात तणाव कमी होणार नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानच्या शांती प्रस्तावाला सकारात्मक मोदी प्रतिक्रिया देणार का? असा सवालही त्यांनी विचारला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.