“बहुजनांचं राज्य मोदींमुळे बघायला मिळाले असून त्यात राणेंना महत्वाची जबाबदारी”- देवेंद्र फडणवीस

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या गुरुवारपासून सुरू होणाऱ्या जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून भाजपाकडून शक्तिप्रदर्शन केले जात आहे.  दरम्यान, आज सकाळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन-आशिर्वाद यात्रेला आजपासून मुंबईतून सुरूवात झाली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला हार अर्पण करुन यात्रेला राणेंनी सुरुवात केली. माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जन-आशिर्वाद यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. “जन आशिर्वाद यात्रेला वरुण राजाचाही आशिर्वाद मिळालेला आहे. तसेही राणेसाहेबांची यात्रा म्हटल्यानंतर ती साधी यात्रा होऊ शकत नाही.

वरुण राजाच्या आशिर्वादाने सुरु झालेली यात्रा महाराष्ट्रातल्या, मुंबईतल्या प्रत्येक जना जनाचा आशिर्वाद घेऊन मोदीजींच्या प्रति कृतज्ञता प्रगट करुन ही यात्रा जाणार आहे,” असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

“बहुजनांचं राज्य हे मोदींमुळे बघायला मिळत आहे. देशातले जे कर्तृत्ववान लोकं मोदींनी निवडून घेतले त्यामध्ये राणेसाहेबांना अत्यंत महत्त्वाची जबाबदारी मिळालेली आहे,” असे फडणवीस म्हणाले.

“८० टक्के उद्योग हे राणे यांच्या खात्याअंतर्गत येतात, देशाचा जीडीपी हा विभाग ठरवतो. महाराष्ट्रमध्ये आज जे सरकार आपल्याला पाहायला मिळत आहे या सरकारच्य नेतृत्वामध्ये महाराष्ट्राची अधोगती सुरू आहे हे मी सांगण्याची गरज नाही. हा महाराष्ट्र गेल्या ५ वर्षामध्ये गुजरातला मागे सोडून देशातल्या पहिल्या नंबरचे राज्य झाले  होते.

सर्वाधिक औद्योगिक गुंतवणूक राज्यात येत होती, पण गेल्या २ वर्षामध्ये महाराष्ट्राचा पहिला नंबर गेला आणि बाकीची राज्ये पुढे चालली आहेत. ज्याप्रकार सरकारी स्तरावर वसुली सुरू आहे त्यासाठीआता संघर्षाशिवाय पर्याय नाही, जनतेसाठी संघर्षं केल्याशिवाय पर्याय नाही,” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. जनतेचा आशा आकांक्षा या मोदींपर्यंत या यात्रेच्या माध्यमातून पोहचवल्या जातील असेही फडणवीस म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.