लखनऊ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीतून निवडणूक अर्ज दाखल केला. यावेळी जदयुचे अध्यक्ष नितीश कुमार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिरोमणि अकाली दलाचे नेते प्रकाश सिंह बादल यांच्यासहीत एनडीएतील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी मोदींनी चार समर्थकांपैकी एका महिला समर्थकांचे पदस्पर्श करून आशीर्वाद घेतले. यामुळे ही महिला समर्थक कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या समर्थकांमध्ये पाणिनी कन्या महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक ९१ वर्षीय अन्नपूर्णा शुक्ला याही उपस्थित होत्या. मोदींनी अर्ज दाखल करण्यापूर्वी अन्नपूर्णा यांचा आशीर्वाद घेतला. अन्नपूर्णा शुक्ला यांनी ४० वर्ष काशी महिला महाविद्यालयात अध्यापन केले आहे.