नवी दिल्ली – देशाच्या घसरलेल्या जीडीपीवरून राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटरवर मोदी सरकारचा उल्लेख मोदी हॉल ऑफ शेम असा केला आहे. मोदी सरकारचा कारभार म्हणजे कमाल बेरोजगारी आणि किमान जीडीपी असा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
आपल्या ट्विटरवर त्यांनी बेरोजगारीच्या वाढत्या प्रमाणाचे चित्र स्पष्ट करणारा ग्राफही टाकला आहे. त्यात देशातील बेरोजगारीचे प्रमाण कमालीचा वाढले असल्याचे दिसत आहे. केंद्र सरकारने कालच जीडीपीचा डाटा जाहीर केला.
त्यात देशाची अर्थव्यवस्था निगेटिव्ह पातळीवर म्हणजेच उणे सात टक्के खाली घसरल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कॉंग्रेसने मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. त्यासाठीच आज पी. चिदंबरम यांची स्वतंत्र पत्रकार परिषदही झाली आहे. त्यापाठोपाठ राहुल गांधी यांनीही ट्विटरवर हल्लाबोल केला आहे.