कराची : जम्मू आणि काश्मीरमध्ये १० वर्षांनंतर निवडणुका झाल्या आणि मंगळवारी निकाल आले. विधानसभेच्या ९० जागांपैकी ४३ जम्मू आणि ४७ जागा काश्मीरमध्ये आहेत. राज्यात नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत, तर भारतीय जनता पक्षाने २९ जागा जिंकल्या आहेत. दरम्यान, पाकिस्तानमध्येही काश्मीरच्या निवडणुकीची चर्चा आहे आणि तिथले लोक भाजपचे कौतुक करत आहेत.
पाकिस्तानातील एका व्यक्तीने सांगितले की, जम्मू-काश्मीरमध्ये 64 टक्के मतदान झाले, यावरून तेथील जनता आनंदी असल्याचे दिसून येते. ते म्हणाले की, निवडणुका भाजपच्या ताब्यात होत्या, असे जर काही लोक म्हणत असतील तर जनतेने कशाला मतदान केले असते? आणि समजा निवडणूक प्रक्रिया भाजपच्याच ताब्यात असती तर त्यांनी बहुमताच्या जागा जिंकल्या असत्या.
राज्यात सगळ्यांत जास्त जागा काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स आघाडीला मिळाल्या आहेत आणि भाजपला फक्त २६ टक्के मते मिळाली आहेत. पण त्यांना एवढीच मते मिळाली असली तरी उरलेली मते ही एकप्रकारे भारत सरकारचीच आहेत. याचा अर्थ हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदींचाच आहे. जिंकलेला राजकीय पक्षही भारतातीलच आहे आणि सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आहे. हा भारताचा विजय आहे.
काश्मीरला पाकिस्तानात सामील व्हायचे आहे, असे अनेकजण म्हणतात, पण तसे असते तर काश्मीरमधील लोकांनी मतदानच केले नसते. पाकिस्तानच्या बलुचिस्तानची स्थिती पाहिली तर येथे निवडणुकीत दोन हजारच मते पडली असती, असे पाकिस्तानी लोकांचे म्हणणे आहे. येथील लोक मतदानच करू इच्छित नाहीत. बलुचिस्तानमधील लोकांचा मतदान व्यवस्थेवरील विश्वास उडाला आहे.
तरीही काश्मीरमध्ये इतक्या लोकांनी मतदान केले याकडे पाकिस्तानी लोकांनीच लक्ष वेधले. लोकांचे जर असे म्हणणे असेल की काश्मीरमध्ये नियंत्रित निवडणुका झाल्या आहेत. अन् हे घडले असे क्षणभर गृहीत धरले तर मोदीच जिंकायला हवे होते. पंतप्रधान मोदी न जिंकल्याने निवडणूक पारदर्शक झाल्याचे सिद्ध होत आहे.
काश्मीरमध्ये पराभव होऊनही पंतप्रधान मोदींनी तेथील लोकांची मने जिंकली आहेत. कलम 370 हटवल्यानंतरही काश्मिरी लोक पूर्णपणे सरकारसोबत आहेत. भारताने काश्मीरवर कब्जा केला आहे, पण संपूर्ण जग त्यावर विश्वास ठेवत नाही. ते त्याला भारताचा भाग म्हणतात. पाकिस्तानी तसे बोलतात कारण तिथे त्यांचे वैयक्तिक स्वार्थ आहेत, पण जग त्यांच्याकडे लक्ष देत नाही.