Agriculture Minister Shivraj Singh Chouhan: केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पिकांची किमान आधारभूत किंमत (MSP) वर खरेदी करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे आश्वासन केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शुक्रवारी राज्यसभेत दिले.
प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान एमएसपीवर झालेल्या चर्चेदरम्यान आणि एमएसपीला कायदेशीर पाठिंबा देण्याची मागणी करणाऱ्या दिल्लीतील शेतकऱ्यांच्या मोर्चादरम्यान कृषीमंत्र्यांनी हे वक्तव्य केले आहे.
कृषीमंत्र्यांनी राज्यसभेत सांगितले की, मी तुम्हाला आश्वासन देतो की, शेतकऱ्यांच्या सर्व मालाची किमान आधारभूत किंमतीवर खरेदी केली जाईल. हे मोदी सरकार आहे आणि मोदींची हमी पूर्ण करण्याची हमी आहे.