नवी दिल्ली – मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील बहुप्रतीक्षित केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार बुधवारी झाला. विस्ताराबरोबरच व्यापक फेरबदल झाल्याने मोदी सरकारचा चेहरामोहरा बदलला आहे. विस्तारावेळी तब्बल 43 मंत्र्यांचा शपथविधी झाला. नारायण राणे, सर्वानंद सोनोवाल या माजी मुख्यमंत्र्यांबरोबरच कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह 15 मंत्र्यांना कॅबिनेट दर्जा मिळाला.
राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा झाला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री उपस्थित होते. विरेंद्र कुमार, अश्वनी वैष्णव, आर.सी.पी.सिंह, पशुपतीकुमार पारस, भुपेंद्र यादव यांनीही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. तर, किरेन रिजीजू, आर.के.सिंह, हरदीपसिंग पुरी, मनसुख मांडवीय, परषोत्तम रूपाला, जी.किशन रेड्डी आणि अनुराग ठाकूर यांना कॅबिनेट मंत्रिपदी बढती मिळाली.
मंत्रिमंडळात 7 महिलांना स्थान मिळाले. त्यामध्ये अनुप्रिया सिंह पटेल, शोभा करंदलाजे, मीनाक्षी लेखी, अन्नपूर्णा देवी, भारती पवार, प्रतिमा भौमिक आणि दर्शना जर्दोष यांचा समावेश आहे.
विस्तारावेळी 28 जणांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामध्ये राजीव चंद्रशेखर, पंकज चौधरी, सत्यपालसिंह बघेल, भानुप्रतापसिंह वर्मा, ए.नारायणस्वामी, कौशल किशोर, अजय भट्ट, बी.एल.वर्मा, देवसिंह चौहान, अजय कुमार, भगवंत खुबा, कपिल पाटील, भागवत कराड, सुभाष सरकार, राजकुमार रंजन सिंह, विश्वेश्वर टुडू, शांतनू ठाकूर, मुंजापारा महेंद्रभाई, जॉन बार्ला, एल.मुरूगन आणि निशिथ प्रमाणिक यांचा समावेश आहे.
उत्तरप्रदेशच्या वाट्याला सर्वांधिक 7 मंत्रिपदे आली आहेत. त्या राज्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे संबंधित घडामोडीला महत्व आहे. विस्तारामुळे केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या आता 77 इतकी झाली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आता खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर मोदी सरकारमधील मंत्रिमंडळात मोठे फेरबदल झाले आहेत. गुजरातमधील मनसुख मांडवीय यांच्याकडे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.
पहा कुठल्या मंत्र्यांकडे कुठले खाते ( Union Cabinet Ministers Portfolio )
- पंतप्रधान नरेंद्र मोदी – विज्ञान तंत्रज्ञान विभाग
- अमित शहा – सहकार मंत्रालयाची जबाबदारी
- नारायण राणे – सुक्ष्म, मध्यम आणि लघू उद्योग मंत्रालय
- कपिल पाटील – पंचायत राज राज्यमंत्री
- मनसुख मांडवीय – आरोग्य मंत्रालय, खते- रसायन मंत्रालय
- अश्विनी वैष्णव – रेल्वे मंत्रालय
- धर्मेंद्र प्रधान – शिक्षण मंत्री, कौशल्य विकास मंत्रिपद
- पियूष गोयल – वस्त्रोद्योग मंत्रालय
- हरदीप सिंह पुरी – पेट्रोलियम मंत्रालय
- ज्योतिरादित्य शिंदे – नागरी उड्डाण मंत्रालय
- पुरषोत्तम रुपाला – दुग्धविकास, मत्स्योत्पादन मंत्रालय
- स्मृती ईराणी – आता केवळ – बालविकास मंत्रिपद
- मीनाक्षी लेखी – परराष्ट्र राज्य मंत्री
- अनुराग ठाकूर – युवा आणि क्रीडा मंत्रालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालय
- पशुपती पारस – अन्न प्रक्रिया मंत्रालय
- भुपेंद्र यादव – श्रम मंत्रायल
- भारती पवार – आरोग्य राज्यमंत्रालय
- भागवत कराड – अर्थ मंत्रालयाचे राज्यमंत्री
- रावसाहेब दानवे – रेल्वे राज्यमंत्री
- आर के सिंह – केंद्रीय कायदे मंत्री
- मिनाक्षी लेखी – परराष्ट्र, सांस्कृतिक राज्यमंत्री
- गिरीराज सिंह – ग्रामविकास मंत्रालय
- आर के सिंह – ऊर्जा मंत्री
- किरन रिजीजू – सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्रालय
- पशुपती पारस – अन्न प्रक्रिया उद्योग