नवी दिल्ली – भाजप नेते किरिट सोमय्या यांना मोदी सरकारकडून झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. सोमय्या यांना धमक्या येत असल्याकारणाने त्यांनी केंद्रसरकारकडे सुरक्षा वाढविण्याची मागणी केली होती. त्यांची ही मागणी केंद्राने मान्य केली असून त्यांना झेड सुरक्षा देण्यात आली आहे.
महाविकास आघाडी सरकारवरमधील नेत्यांचे व मंत्र्याचे घोटाळे उघड करु असे किरिट सोमय्या म्हणाले होते त्यानंतर त्यांना धमक्या येऊ लागल्या होत्या. या कारणामुळे सोमय्या यांनी केंद्र सरकारकडे सुरक्षा वाढवण्याची मागणी केली होती. सोमय्या यांची मागणी केंद्र सरकारने मान्य केली असून त्यांना आता झेड दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे.
किरिट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील ११ नेत्यांची नावे जाहीर करत कथित भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. यात मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांसह मंत्र्यांनी घोटाळा केल्याचे ते म्हणाले होते. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे ते मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि परिवहन मंत्री अनिल परब, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचीही नावे होती. तसेच अनिल परब यांची चौकशी सुरु असून जितेंद्र आव्हाड आणि भावना गवळी यांचा पुढचा नंबर असल्याचे किरिट सोमय्या म्हणाले होते.