सरकारने जाहिरातींवर ४००० करोड खर्चून जनतेच्या पैशांची उधळपट्टी केली : उद्धव ठाकरे

मुंबई: केंद्र आणि राज्यसरकार मध्ये भाजपा सोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या पक्ष प्रमुखांनी भाजपावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. भाजपा सरकारने स्वतःच्या योजनांची जाहिरात करण्यासाठी ४००० कोटींची उधळपट्टी केली असल्याचा खळबळजनक आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. मोदी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकांवेळी परदेशातून सगळा काळा पैसा परत आणून प्रत्येक भारतीयाला १५ लाख वाटण्याचे आश्वासन दिले होते मात्र आपले आश्वासन पूर्ण करायचं सोडून मोदीजी जनतेच्या घामाचा पैसा जाहिरातींवर उधळत असल्याची टीका ठाकरे यांनी पंतप्रधानांवर केली.
उद्धव ठाकरे म्हणाले, ‘एकत्रित निवडणुकांना शिवसेनेचा पाठींबा असल्याचे जाहीर करत ‘जुमले’ वापरून एकदाच निवडणूका जिंकता येतात त्यामुळे एकत्रित निवडणुकांचे नाव पुढे करून जनतेला पुन्हा मूर्ख बनवता येईल, अशा भ्रमात सरकारने राहू नये” असा सल्ला त्यांनी दिला.
यावेळी वाढत असलेल्या वृद्धीदराबाबत विचारले असता उद्धव यांनी “जर वृद्धिदर वाढत आहे तर मग देशातील नागरिकांच्या उत्पन्नात वाढ का होत नाही? जर वृद्धिदर वाढत आहे तर दूधदर वाढीसाठी शेतकऱ्यांना का आंदोलने करावी लागली?, जर वृद्धिदर वाढला आहे तर देशातील शेतकरी का आत्महत्या करत आहेत?” असे प्रतिप्रश्न उपस्थित केले. येथून पुढच्या निवडणुकांमध्ये शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचा निर्वाळा देखील त्यांनी यावेळी केला.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)