नवी दिल्ली – बांगलादेशच्या सद्यस्थितीबाबत भारत सरकार सतर्क आहे. आता केंद्र सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी सरकारने एक समिती स्थापन केल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करून दिली आहे.
सीमा सुरक्षा दलाच्या पूर्व कमांडचे एडीजी यांना समितीचे अध्यक्ष करण्यात आले आहे. यापूर्वी बांगलादेश सीमेवर सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) दक्षता वाढवली आहे. बांगलादेशातील हिंसाचाराच्या घटनांमुळे भारत सरकारची चिंता वाढली आहे.
In the wake of the ongoing situation in Bangladesh, the Modi government has constituted a committee to monitor the current situation on the Indo-Bangladesh Border (IBB). The committee will maintain communication channels with their counterpart authorities in Bangladesh to ensure…
— Amit Shah (@AmitShah) August 9, 2024
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट केले की, बांगलादेशातील सध्याची परिस्थिती पाहता, भारत-बांगलादेश सीमेवरील (IBB) सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी मोदी सरकारने एक समिती स्थापन केली आहे.
भारतीय नागरिक, हिंदू आणि तेथे राहणाऱ्या इतर अल्पसंख्याक समुदायांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी समिती बांगलादेशातील आपल्या समकक्ष अधिकाऱ्यांशी संवाद साधेल. या समितीचे अध्यक्ष सीमा सुरक्षा दलाच्या पूर्व कमांडचे एडीजी असतील.