वडोदरा – कॉंग्रेस पक्ष मला दररोज दोन किलो शिव्या देतो असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात. पण, वस्तुस्थिती वेगळी आहे. मोदीच कॉंग्रेसला दररोज चार क्विंटल शिव्या देतात, असे प्रत्युत्तर कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिले.
आम्ही अपमान करत असल्याचे मोदी म्हणतात. खरेतर, तेच आमच्यावर सतत टीका करत असतात. आम्हाला शिव्या दिल्याशिवाय त्यांना बहुधा अन्न पचत नसावे, असे खर्गे गुजरातमधील कॉंग्रेसच्या एका सभेत बोलताना म्हणाले.
मोदी अनेकदा स्वत:चा उल्लेख गरीब म्हणून करतात. ते तसे आणखी किती काळ बोलत राहणार? मोदी 13 वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री होते. मागील 8 वर्षांपासून ते पंतप्रधानपदाची धुरा सांभाळत आहेत. तसे असूनही ते गरीब कसे, असा सवाल खर्गे यांनी केला.