नवी दिल्ली : प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांनी सध्या युनायटेड किंगडममधील न्यायालयात चिनी बँकांच्या सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान आपण एक साधारण आयुष्य जगत असल्याचे म्हटले आहे. तसेच आपल्याकडे असलेले दागिने विकून आपण आपल्या वकिलांची फी भरत असल्याचेही त्यांनी न्यायालयाला सांगितले आहे. यावरून आता ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
Anil Ambani told a UK Court that he sold his wife's jewellery to pay his legal fees and owns nothing, just one small car! This is the guy to whom Modi gave the Rafale offset contract worth 30,000 crores! pic.twitter.com/J9B3D7dawF
— Prashant Bhushan (@pbhushan1) September 26, 2020
“अनिल अंबानी यांनी युकेमधील न्यायालयात, वकिलांची फी भरण्यासाठी पत्नीचे दागिने विकले असून आता आपल्याकडे काहीही नाही, केवळ एक छोटी कार आहे अशी माहिती दिली. ही तीच व्यक्ती आहे ज्यांना मोदींनी ३० हजार कोटींचं राफेलचं ऑफसेट कंत्राट दिलं”.असं प्रशांत भूषण यांनी ट्विट केलं आहे.
“यावर्षी जानेवारी ते जून या कालावधीदरम्यान आपण ९.९ कोटी रूपयांच्या सोन्याचे दागिने विकले. आता आपल्याकडे कोणतंही महागडं सामान शिल्लक नाही,” असं अनिल अंबानी यांनी न्यायालयाला सांगितलं आहे. दरम्यान, यावेळी न्यायालयाने त्यांना त्यांच्याकडे असलेल्या लग्झरी गाड्यांबद्दलही प्रश्न केला असता, “या सर्व माध्यमांमधून अफवा पसरवल्या जात आहेत. माझ्याकडे कधीही रोल्स रॉयस नव्हती. मी सध्या केवळ एकाच गाडीचा वापर करत आहे,” असंही अंबानी म्हणाले.