राज ठाकरेंच्या पोलखोल नंतर ‘मोदी फॉर न्यू इंडिया’ पेज फेसबुकवरुन गायब

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे राज्यात सभा घेत आहेत. राज ठाकरे यांनी यापूर्वी नांदेड, सोलापूर, इचलकरंजी, सातारा, पुणे, महाड येथील सभेतून नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर टीका केली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आगामी लोकसभा निवडणूक लढवनार नसली, तरी भाजप विरोधात त्यांनी चांगलीच टीका सुरु ठेवली आहे.

यापूर्वी, सोलापूर येथील सभेत राज ठाकरे यांनी हरिसाल या डिजिटल गावाच्या जाहिराती संदर्भात पोलखोल केली होती. त्यानंतर रायगड येथील सभेत बोलताना राज ठाकरे यांनी, मोदींनी खासदार म्हणून जे नागापूर गाव दत्तक घेतले होते, त्याची पोलखोल व्हिडिओच्या माध्यमातून केली.

दरम्यान, काल मुंबईत सभेत राज ठाकरेंनी ‘मोदी है तो मुमकिन है’ भाजपच्या जाहिरातीमधील ‘मोदी फॉर न्यू इंडिया’ या फेसबुक पेजवर झळकलेले कुटुंब व्यासपीठावर हजर केले. या कुटुंबाचा आणि जाहिरातीचा कोणताही संबध नसल्याचे राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पुराव्यानिशी सिद्ध केले.

पुढे बोलताना राज ठाकरे यांनी, अशा किती कुटुंबियांचा वापर केला असेल, किती खोटा प्रचार करणार हे लोक करणार आहेत? असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित केला. राज ठाकरेंच्या सभेतील पोलखोलनंतर मोदींची जाहिरात असलेलं पेज गायब झालं आहे. चिले कुटुंबाचा फोटो असलेलं ‘मोदी फॉर न्यू इंडिया’ पेज फेसबुकवरुन हटवण्यात आले आहे. ही जाहिरात आमची नाही, असा दावा करणाऱ्या भाजपने हे पेज का हटवले, असा सवाल मनसेने केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.