असाही मोदी फॅन, शपथविधी सोहळ्यानिमित्त दिल्लीत विकत आहे चहा

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या घवघवीत यशानंतर नरेंद्र मोदी यांचा आज सायंकाळी ७च्या सुमारास शपथविधी होणार आहे. या सोहळ्यासाठी देश-विदेशातील अनेक दिग्गज नेतेमंडळी आणि इतर मान्यवर आज दिल्लीत उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, आजच्या या शपथविधी सोहळ्यानिमित्त बिहारचा एक चहावाला अवलिया राजधानीत चहा विकत आहे.

बिहारचे मुजफ्फरपूरचे राहणारे अशोक ‘मोद यांना समर्थन दर्शविण्यासाठी दिल्लीत चहा विकत आहेत. ते म्हणाले, ‘मी मुझफ्फरपूरमध्ये चहा विकत होतो. जेथे नरेंद्र मोदी यांची सार्वजनिक बैठक असते तेथे मी चहा भेट आणि विक्री करण्याचा प्रयत्न करतो. तसेच आज शपथ ग्रहण समारंभ होईपर्यंत चहा विकणार आहे, समारंभ संपल्यानंतर मी परत जाईल.’

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)