नवी दिल्ली : “कोविडचा विषाणू धर्म जात पंथ असला कोणताहीं भेदभाव करीत नाही. त्यामुळे करोनाचा सर्वांना समान धोका आहे याची आपण जाणिव ठेवली पाहिजे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. त्यामुळे यापुढील काळात अशा आपत्तींचा मुकाबला करण्यासाठी आपल्याला एकत्रच आले पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे.
एका वेबसाईटला त्यांनी आपली पोस्ट टाकली आहे, त्यात त्यांनी हे मतप्रदर्शन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की यापुर्वीच्या काळात आपण वेगवेळ्या मुद्द्यांवर विभागलेले असू पण आता मात्र अशा स्वरूपाच्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी आपल्याला एकत्र यावे लागत आहे. यापुढील काळात आपल्याला विधायक बदलांचा अवलंब करावा लागणार आहे असेही त्यांनी म्हटले आहे.