मोदी काय कोणीच आरक्षणाला धक्का लावू शकत नाही : पंतप्रधानांचे वक्तव्य

गया : लोकसभा निवडणुकांच्या पार्शवभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरामध्ये सभांचा धडाका लावला आहे. याच पार्श्ववभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बिहार येथे एक जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेद्वारे उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरून काँग्रेसवर निशाणा साधला तसेच आरक्षण संपवण्याबाबतच्या बातम्यांवरही वक्तव्य केले.

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, “भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना निवडणुकांमध्ये पराभूत करण्यासाठी काँग्रेसने अनेक डावपेच खेळले होते. आजच्या युवा पिढीला हा इतिहास माहित असायला हवा.” असे वक्तव्य करत काँग्रेसवर निशाणा साधला.

या सभेमध्ये बोलताना पंतप्रधानांनी आरक्षण संपविण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याच्या चर्चांना अफवा ठरवताना म्हंटले की, “मोदीच काय तर देशातील कोणतीही ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणाला धक्का लावू शकणार नाही.”

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.