इतर लोकांशी मोदींची तुलनाही होऊ शकत नाही : रामदेव बाबा 

नवी दिल्ली: योग गुरू बाबा रामदेव यांनी पंतप्रधान नरेंद मोदी यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला आहे. मोदींच व्यक्तिमत्व हे हिमालयासारखे आहे. इतर लोकांशी त्यांची तुलनाही होऊ शकत नाही. देशाला राजकीय स्थैर्य, विकास आणि बळकट करण्यात मोदींचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे भारताच्या जनतेने मोदींना २०१९ ला पुन्हा एकदा निवडून देत आणखी एक संधी दिली पाहिजे. असं, योग गुरु रामदेव बाबा यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हंटल आहे.

लोकसभा निवडणुक मतदानाचा आज पहिला टप्पा पार पडला. दरम्यान, कलाकार व अनेक नेते नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करावे, म्हणून आवाहन करत आहेत. तसेच काही अभिनेत्यांनी विरोधही केला आहे.

१७ वी लोकसभा अस्तित्वात येण्यासाठी आज, गुरूवारी लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात देशातील १८ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांतील ९१ मतदारसंघात मतदान होत आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×