मोदी, शहांच्या होमपिचवर भाजपला पैकीच्या पैकी

गुजरातमधील सर्व 26 जागा खिशात

अहमदाबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचे होमपिच असणाऱ्या गुजरातमध्ये भाजपने महत्वाच्या परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवले. त्या राज्यातील लोकसभेच्या सर्व 26 जागा भाजपने खिशात घातल्या. त्यामुळे मागील लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती यावेळीही झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गुजरातमध्ये अवघ्या दीड वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने भाजपला कॉंटे की टक्कर दिली होती. त्या राज्याची सत्ता राखताना भाजपची मोठीच दमछाक झाली होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत यावेळी कॉंग्रेस चांगली कामगिरी करू शकेल, असे अंदाज वर्तवले जात होते. मात्र, भाजपने ते फोल ठरवले. त्या राज्यात विजय मिळवणाऱ्या प्रमुख उमेदवारांमध्ये शहा यांचा समावेश आहे.

त्यांनी गांधीनगर मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे बाजी मारली. आता ते प्रथमच सदस्य म्हणून लोकसभेत प्रवेश करणार आहेत. मोदींच्या नेतृत्वाखालील नव्या केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळणार का, याविषयीच्या चर्चांना आतापासूनच उधाण आले आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता गुजरातने मोदींच्या नेतृत्वावर सलग दुसऱ्यांदा शत-प्रतिशत विश्‍वास दर्शवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)