टिकल्यांच्या पाकिटावर मोदींचा फोटो

नवी दिल्ली – देशात सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. सोशल मीडियापासून ते नाक्‍यापर्यंत सगळीकडे निवडणुकीची चर्चा आहे. 11 एप्रिलपासून मतदानाला सुरुवात होणार आहे. एकीकडे प्रचारसभांची सुरुवात झाली असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असताना बाजारातही निवडणुकीची धूम आहे.

मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून वेगवेगळी शक्कल लढवली जात असून भाजपा त्यात आघाडीवर असल्याचं दिसत आहे. साडी, टी-शर्टनंतर आता बाजारात नरेंद्र मोदींचा फोटो असणारे टिकल्यांचे पाकीटही आले आहे. या पाकिटावर एकीकडे नरेंद्र मोदींचा फोटो आहे, तर दुसरीकडे भाजपाचे निवडणूक चिन्ह छापण्यात आले आहे. या पाकिटावर पारस फॅन्सी बिंदी लिहिण्यात आले आहे. फोटोशॉप करून नरेंद्र मोदींचा फोटो वापरला असल्याची शक्‍यता वर्तवण्यात येत असून अद्याप त्याची खात्री पटलेली नाही. मात्र हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा फोटो शेअर करत अनेकजण भाजपाची खिल्ली उडवत आहेत. तर दुसरीकडे समर्थक या फोटोवरून विरोधकांवर निशाणा साधत आहेत. फोटो शेअर करत अनेकजण मजेशीर कमेंट्‌स करत आहेत. बाजारात याआधी नरेंद्र मोदींचा फोटो असणाऱ्या साड्या आल्या आहेत. अनेक ठिकाणी या साड्यांची विक्री होत आहे. सूरतमध्ये अशा साड्यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.