मोदींनी सर्व प्रश्नांना मनातल्या मनात उत्तरे दिली; जयंत पाटलांनी घेतली फिरकी

नवी दिल्ली: ५ वर्षात पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. राजधानी दिल्लीत भाजपने पत्रकार परिषद आयोजित केली आहे. दरम्यान, भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजपच्या मुख्यालयात ही पत्रकार परिषद होत पार पडली. मोदी यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरे देण्याचे टाळले. मोदींना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अमित शाह यांनीच दिली. नरेंद्र मोदी आपली प्रतिक्रिया देऊन मोकळे झाले.

एका प्रश्नावर तरी मोदींनी उत्तर द्यावं, असा आग्रह पत्रकाराने धरला असता ‘भाजपात अध्यक्षच आमच्यासाठी सर्व काही असतात’, असे म्हणत मोदींनी उत्तर देण्याचे टाळले. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोदींची चांगलीच फिरकी घेतली आहे. ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ऐतिहासिक व धाडसी पत्रकार परिषदेबद्दल अभिनंदन ! गोहत्या, नोटबंदी, राफेल भ्रष्टाचार, बेरोजगारी या सर्व प्रश्नांना नरेंद्र मोदींनी उत्तरे दिली, मनातल्या मनात” !

Leave A Reply

Your email address will not be published.