”मोदी आणि गांधी एकच आहेत”

ह्युस्टन : अमेरिकेतील ह्युस्टन शहरामधील एनआरजी स्टेडिअममध्ये हाऊडी मोदी हा कार्यक्रम सुरु झाला असून सोशल मिडीयावरही नेटकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. या कार्यक्रमाला जवळपास 50 हजाराच्या आसपास नागरिकानी उपस्थिती लावली आहे. या कार्यक्रमाला प्रक्षकांमध्ये महात्मा गांधींच्या वेशात आलेल्या एका भारतीय नागरिकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या नागरिकाला तुम्ही काय संदेश देणार असे विचारण्यात आल्यावर . ”मोदी आणि गांधी एकच आहेत” असे सांगण्यात आलं आहे.

गांधींचा वेश परिधान केलेल्या नागरिकाचे नाव रमेश मोदी असून, ते म्हणले ”मोदी आणि गांधी एकच आहेत. ते संत, फकीर आहेत. गांधी फकीर होते, मोदींचेही सारखेच वागणे आहे”. दरम्यान कार्यक्रमाची सुरुवात भरतनाट्य, गरब्याने झाली. यानंतर तबलावादन, व्हायोलिन आदी वाद्यांची मैफल रंगली होती. यानंतर मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत अमेरिकेच्या खासदारांनी केले. यावेळी मोदी यांनी वाकून उपस्थितांना नमस्कार केला. यावेळी मोदी, मोदीच्या घोषणेने स्टेडिअम दणाणून गेले होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.