चट्टोग्राम(बांगलादेश) – शाकिब अल हसनच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर बांगलादेशने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाहुण्या इंग्लंडवर 50 धावांनी मात केली. या पराभवानंतरही इंग्लंडने मालिका 2-1 अशी जिंकली. विजयासाठी आवश्यक असलेल्या 247 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 196 धावांवर अटोपला.
Modhumoti Bank Limited ODI Series: Bangladesh vs England
England has won the Series by 2-1
Player of the Series: Adil Rashid (31 runs & 8 wickets)#BCB | #Cricket | #BANvENG pic.twitter.com/dSgX3Hoznv
— Bangladesh Cricket (@BCBtigers) March 6, 2023
सॅम करनने बांगलादेशची सलामी जोडी लिटन दास व तमिम इक्बाल यांना 17 धावांवर बाद केल्यानंतर नजमूल शांतो आणि मुशफीकूर रहीम यांनी 98 धावांची भागीदारी करीत बांगलादेशचा डाव सावरला. त्यानंतर गोलंदाजीत शाकिब अल हसनच्या गोलंदाजीसमोर इंग्लंड फलंदाजांनी नांगी टाकली. शाकिबने चार ब्रिटीश फलंदाज बाद केले तर इबादत हुसेन व ताईजूल इस्लाम यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
रेहान ठरला सर्वांत युवा खेळाडू
रेहान अहमदने या सामन्यात इंग्लंडकडून पदार्पण केले. एकदिवसीय सामन्यात पदार्पण करणारा तो इंग्लंडचा सर्वांत कमी वयाचा खेळाडू ठरला. तो 18 वर्षांचा असून यापूर्वी बेन होलिओकेने(वय 20) इंग्लंडचा सर्वांत कमी वयाचा खेळाडू होता. तर दुसरीकडे एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा हसन रझा हा कमी वयात पदार्पण करणार खेळाडू आहे. पदार्पनावेळी हसनचे वय अवघे 14 वर्ष होते.
संक्षिप्त धावफलक
बांगलादेश : 48.5 षटकांत 246 (नजमूल शांतो 53, मुशफीकूर रहीम 70, शाकिब अल हसन 75; जोफ्रा आर्चर 3-35, आदिल रशीद 2-21) विजयी. वि. इंग्लंड : 43.1 षटकांत सर्वबाद 196 (फिल साल्ट 35, जेम्स विन्से 38, जोस बटलर 26, ख्रिस वोक्स 34; शाकिब अल हसन 4-35, इबादत हुसेन 2-38, ताईजूल इस्लाम 2-52).
शाकिबचा विक्रम
या सामन्यात 4 बळी घेऊन शाकिबने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 6000 धावा आणि 300 बळींचा टप्पा गाठला आहे. अशाप्रकारे तो बांगलादेशकडून या फॉरमॅटमध्ये अशी कामगिरी करणारा जागतिक क्रिकेटमधील पहिला आणि 14 वा गोलंदाज बनला.
तसेच शाकिबने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा एका सामन्यात 4 बळी घेण्याच्या बाबतीत दिवंगत शेन वॉर्न आणि शाहिद आफ्रिदी यांनाही मागे टाकले. याशिवाय शाकिबने एकदिवसीय सामन्यात अर्धशतकासह 4 बळी मिळवत आफ्रिदीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. आफ्रिदीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 3 वेळा हा पराक्रम केला होता.