पैशांसह वेळेत बचत : विघ्नहर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जपानचे यंत्र दाखल
निवृत्तीनगर – साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून जपान देशाच्या जायका प्रोजेक्टचे “उ ओतानी’ कंपनीचे ऊस तोडणी यंत्र (हार्वेस्टर) बुधवारी (दि. 4) जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर कारखान्याकडे सुपूर्त करण्यात आले असल्याची माहिती विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी सांगितली.
कारखाना कार्यक्षेत्रातील ओझर (गणपतीचे) याठिकाणी संतू लक्ष्मण मांडे यांच्या उसाच्या शेतावर या हार्वेस्टरने ऊस तोडणीस प्रारंभ करुन जपान सरकारच्या जायका प्रोजेक्टचे ‘उ ओतानी’ कंपनीचे केन हार्वेस्टर ऊस तोडणी यंत्र विघ्नहर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊस तोडणी करण्याकरीता साखर आयुक्त यांच्याकडून कारखान्याकडे सुपूर्त करण्यात आले.
याप्रसंगी अध्यक्ष सत्यशील शेरकर, उपाध्यक्ष अशोक घोलप, तसेच साखर आयुक्त कार्यालयाचे प्रादेशिक सहसंचालक डोईफोडे, प्रादेशिकचे कृषी अधिकारी पटेल, जायका प्रोजेक्टचे व ‘उ ओतानी’ कंपनीचे प्रतिनिधी, कारखान्याचे संचालक सचिन टाव्हरे, यशराज काळे, तज्ज्ञ संचालक धनेश पडवळ, कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्ग जंगले, सेक्रेटरी अरुण थोरवे, मुख्य शेतकी अधिकारी गोरखनाथ उकिर्डे, ऊस विकास अधिकारी संदीप जाधव, तान्हाजी बेनके, श्यामसुंदर पडवळ, कैलास मांडे, सुनिल कवडे, अशोक मांडे, प्रकाश टेंभेकर, प्रशांत देशमुख, नागूजी रवळे, आनंद औटी, विलास बेनके,सुभाष भोर, विजय भोर, रामचंद्र बेनके, पांडूरंग वायकर, साहेबराव येंधे, चिंतामण कवडे, मंगेश मांडे, विश्वास वायकर, नितीन दांगट, अनिल मांडे, नवनाथ मांडे, किशोर कवडे,
अविनाश भोर(पान 3 पहा)8