ऊसतोडणीसाठी अत्याधुनिक हार्वेस्टर दाखल

पैशांसह वेळेत बचत ः विघ्नहर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जपानच्या यंत्र दाखल

निवृत्तीनगर-साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून जपान देशाच्या जायका प्रोजेक्‍टचे “उ ओतानी’ कंपनीचे ऊस तोडणी यंत्र (हार्वेस्टर) बुधवारी (दि. 4) जुन्नर तालुक्‍यातील श्री विघ्नहर कारखान्याकडे सुपूर्त करण्यात आले असल्याची माहिती विघ्नहरचे चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी सांगितली. कारखाना कार्यक्षेत्रातील ओझर (गणपतीचे) याठिकाणी संतू लक्ष्मण मांडे यांच्या उसाच्या शेतावर या हार्वेस्टरने ऊस तोडणीस प्रारंभ करुन जपान सरकारच्या जायका प्रोजेक्‍टचे ‘उ ओतानी’ कंपनीचे केन हार्वेस्टर ऊस तोडणी यंत्र विघ्नहर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊस तोडणी करण्याकरीता साखर आयुक्त यांच्याकडून कारखान्याकडे सुपूर्त करण्यात आले.

याप्रसंगी चेअरमन सत्यशिल शेरकर, व्हाईस चेअरमन अशोक घोलप, तसेच साखर आयुक्त कार्यालयाचे प्रादेशिक सहसंचालक डोईफोडे, प्रादेशिकचे कृषी अधिकारी पटेल, जायका प्रोजेक्‍टचे व ‘उ ओतानी’ कंपनीचे प्रतिनिधी, कारखान्याचे संचालक सचिन टाव्हरे, यशराज काळे, तज्ज्ञ संचालक धनेश पडवळ, कार्यकारी संचालक राजेंद्ग जंगले, सेक्रेटरी अरुण थोरवे, मुख्य शेतकी अधिकारी गोरखनाथ उकिर्डे, ऊस विकास अधिकारी संदीप जाधव, तान्हाजी बेनके, श्‍यामसुंदर पडवळ, कैलास मांडे, सुनिल कवडे, अशोक मांडे, प्रकाश टेंभेकर, प्रशांत देशमुख, नागूजी रवळे, आनंद औटी, विलास बेनके, सुभाष भोर, विजय भोर, रामचंद्र बेनके, पांडूरंग वायकर, साहेबराव येंधे, चिंतामण कवडे, मंगेश मांडे, विश्वास वायकर, नितीन दांगट, अनिल मांडे, नवनाथ मांडे, किशोर कवडे, अविनाश भोर आदिंसह ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जपानमधील “उ ओतानी’ कंपनीकडून तयार करण्यात आलेल्या ऊस तोडणी यंत्राची (हार्वेस्टर) चाचणी घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून श्री विघ्नहर कारखान्याची नुकतीच निवड करण्यात आली होती. ‘उ ओतानी’ कंपनीच्या तंत्रज्ञांनी विघ्नहर कारखान्याच्या संपूर्ण कार्यक्षेत्राची कारखाना शेतकी विभागाचे अधिकारी व कर्मचारी वर्गासमवेत सखोल पाहणी करुन विघ्नहर कारखान्याचा ऊस गाळप हंगाम 2019-2020 मध्ये या ऊस तोडणी यंत्राची (हार्वेस्टरची) प्रायोगिक तत्वावर चाचणी घेण्याचा निर्णय करण्यात आला होता. त्यानुसार 26 नोव्हेंबरपासून ‘उ ओतानी’ कंपनीचे प्रतिनिधी आणि जायका एजन्सीचे प्रतिनिधी विघ्नहर कारखाना साइटवर येऊन यंत्राच्या ट्रेनिंगचे काम पूर्ण केले. 2 डिसेंबरला साखर आयुक्त कार्यालयाचे अधिकारी वर्ग व “उ ओतानी’ कंपनीचे तंत्रज्ञ यांनी विघ्नहर कारखान्याचे ऊस बेणेमळ्यावरील ऊसाचे प्लॉटवर ऊस तोडणी यंत्राची (हार्वेस्टर) ट्रायल घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.