‘मोदकनिर्माती’ विद्या बालन

बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालन गेल्या काही दिवसांपासून सिनेसृष्टीपासून लांब आहे. पण तरीही तिचे ग्लॅमर कमी झालेले नाही. आजही ती काही ना काही कारणांनी चर्चेत असते. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात विद्या नव्याच्या शोधात आहे आणि सातत्याने नव्या गोष्टी करून चाहत्यांना ती आश्‍चर्याचा धक्‍का देत असते. विद्याला घरातील काम करताना आजवर अनेकांनी पाहिले आहे.

ती घराची स्वच्छता अत्यंत उत्तम प्रकारे करते; परंतु तिला कुकिंगची आजिबात आवड नाही. त्यामुळे तिला छान छान स्वयंपाक करता येत नाही. पण सध्याच्या लॉकडाऊनच्या काळाचा फायदा करुन घेताना विद्याबाई चक्‍क काही डिशेस बनवायला शिकत आहेत. धक्‍कादायक बाब म्हणजे, अलीकडेच तिला मोदक बनवताना पाहिले गेले. मोदक ही विद्याची फेवरिट डिश आहे.

केवळ विद्याच नव्हे तर गेल्या 40-45 दिवसांमध्ये बी-टाऊनमधील अनेक सेलीब्रेटी घरकामामध्ये आणि खास करुन स्वयंपाकामध्ये आपला वेळ व्यतीत करताना दिसत आहेत आणि गंमत म्हणजे आजवर मला हे जमणार नाही, हे माझं काम नाही असं म्हणणारे हे तारे-तारका आता यामध्ये आनंदाने रमलेले दिसताहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.