पुणे – जागा खाली कर अन्यथा आम्हाला दोन लाख रूपये दे म्हणत खंडणी मागणाऱ्यांना नकार दिल्यानंतर तलवार डोक्यात घालून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या हडपसर येथील ओकांरसिंग टाक टोळीवर संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली ही वी कारवाई आहे.
टोळी प्रमुख ओंकारसिंग करतारसिंग टाक (26), सोरनसिंग करतारसिंग टाक (21), अवतारसिंग करतारसिंग टाक (28), जपानसिंग करतारसिंग टाक (31), तुफानसिंग करतारसिंग टाक (30, सर्व रा. गाडीतळ, हडपसर) यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
ओकांरसिंग याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने बेकायदेशिर टोळी तयार करून खुनाचा प्रयत्न, जबर दुखापत करून दहशत निर्माण करणे, जबरी चोरी, दरोडत्त टाकणे, खंडणी वसतुल करणे, घातक शस्त्र विना परवाना बाळगणे तसेच नागरिकांत दहशत निर्माण करणे अशा प्रकारची कृत्यू केली असल्याने हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोक्काचा प्रस्ताव तयार करण्यात आला. दरम्यान हा प्रस्ताव अपर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांना सादर करण्यात आला असता त्यांनी या प्रस्तावास मंजुरी दिली. गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र गलांडे करत आहेत.