पुणे : विमाननगर प्रभाग क्रमांक 3 मध्ये महापालिकेच्या वतीने फिरते लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी नगरसेवक राहूल भंडारे यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यकडे केली आहे.
प्रभाग क्रमांक 3-अ, विमान नगर-सोमनाथ नगरमध्ये सर्वे केल्यावर असे लक्षात आले की, अनेक ज्येष्ठ नागरिक हे लसीकरण केंद्रावर गर्दी व लागणारा वेळ यामुळे लसीकरण करून घेत नाहीत. तर, प्रभाग क्रमांक तीन, विमान नगर-सोमनाथ नगर येथे असणाऱ्या मोठ्या सोसायट्या तसेच अनेक वसाहती आहेत. तसेच प्रभागातील लोहगाव, यमुनानगर, संजय पार्क, गुरुद्वारा, कलवड, संतनगर, गांधीनगर, विकफिल्ड वसाहत, सिद्धार्थनगर,खुळेवाडी, सोमनाथनगर, इंदीरानगर बर्मासेल येथे मोठी लोकसंख्या आहे. दूर असणाऱ्या नागरिकांना लसीकरण सेंटरवर येण्यास पायपीट होत आहे.
ही बाब लक्षात घेऊन या परिसरासाठी फिरते लसीकरण केंद्र सुरू करावे अशी मागणी केली आहे. तर, लवकरच हा प्रयोग अंमलात आणू असे आश्वासन मोहळ यांनी दिले. नगरसेवक राहुल भंडारे, क्रीडा समिती अध्यक्ष अजय खेडेकर, शहर सुधारणा अध्यक्ष आनंद रिठे, नाव समिती अध्यक्ष धनराज घोगरे, तुषार पाटील उपस्थित होते.