देशभरातून एडलवाईजच्या ट्रेडिंग ऍपला मिळत आहे उत्तम प्रतिसाद

पुणे – एडलवाईज मोबाइल ट्रेडर (ईएमटी) हे शेअरबाजारात व्यवहार आणि गुंतवणूक करणाऱ्यांना उपयोगी पडेल असे शक्‍तिशाली व सोईचे ऍप आहे. याद्वारे आपण शेअर खरेदी-विक्री, बाजारभावाचा मागोवा, डेरिव्हेटिव्ह आणि परकीय चलन व्यवहार करू शकतो. तसेच अ-परिवर्तनीय रोखे, बॉण्ड म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतो. या ऍपच्या फिचर स्क्रीनवर नजर टाकली तरी आपल्याला खरेदी-विक्री करण्यासंबंधात अंदाज येऊ शकतो.

गुंतवणूकदाराने ठरविलेल्या निकषांच्या आधारे ट्रेडर खरेदीसाठी शेअरची निवड करू शकतो. गुंतवणूकदार हे ऍप वापरून आपल्या गरजेनुसार काही निकष ठरवू शकतो आणि त्या गुंतवणुकीचा कोणता पर्याय निवडायचा हे ठरवू शकतो. या ऍपच्या लाइव्ह न्यूज, या फिचरमुळे शेअरबाजारातील ताज्या घडामोडींचा अंदाज येतो. त्याचबरोबर कंपन्यांच्या ताळेबंदासह इतर उपयुक्‍त माहिती उपलब्ध होते. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीच्या शिफारशी, त्या फंडाची कामगिरी तपासणी आणि प्रत्यक्ष खरेदी ही तिन्ही कामे झटपट होतात.

या ऍपच्या वेगवान आणि शैलीदार कामामुळे त्याला 5 पैकी 4.5 हे गुगल प्ले ऍप स्टोअरवरचे सर्वात वरचे मानांकन मिळाले आहे, असे सांगण्यात आले. याचा अर्थ भारतात हे ऍप वापरणाऱ्यांना ते आवडले आहे आणि त्यामुळे त्यांचा व्यवहार करताना फायदा होताना दिसून येत आहे. त्यामुळे ऍपचे वापरकर्ते ऍप वापरल्यानंतर त्याबाबत चांगला प्रतिसाद देत आहे. यामुळे या ऍपचे मानांकन वाढले असल्याचे दिसून येत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.