मोबाईल टॉवरच्या कंपाउंड तारेला अडकून तरुणीचा मृत्यू

वाघोली – मोबाईल टॉवरच्या कंपाउंड तारेला अडकून तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना वाघोली येथील संत तुकारामनगर येथे मंगळवारी (दि. 24) रात्री आठच्या सुमारास घडली. कोमल अरुण नेमाडे (वय 22) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कोमल नेमाडे (रा. संत तुकाराम नगर, वाघोली) रात्री आठच्या सुमारास घराबाहेर गेली होती. त्यानंतर अचानक मोठा आवाज आला आणि कोमलही घराच्या जवळच असणाऱ्या मोबाईल टॉवरच्या तारेच्या कंपाउंड जवळ दिसली. तिच्या घरच्यांनी आणि शेजारच्यांनी तिला शॉक लागला असल्याचे समजून तारेच्या कंपाउंडपासून लांब केले आणि तात्काळ रुग्णालयात हलविले. परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यूू झाल्याचे घोषित करण्यात आले. तिच्या हाताला आणि पायांना जखमा असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद लोणीकंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून या संशयास्पद मृत्यूचा तपास पोलिस करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कोमल नेमाडे ही जेएसपीएम महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होती. कोमल नेमाडेच्या घराजवळ असणाऱ्या मोबाईल टॉवरच्या तारेच्या कंपाउंडजवळ तिचा संशायस्पद मृत्यू झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. प्रथदर्शनी विजेचा शॉक बसला असल्याची शक्‍यता वर्तवण्यात येत होती मात्र शरीरावर तशा खुणा नव्हत्या. मोबाईल टॉवरच्या फ्रिक्वेन्सीमुळे काही घडले तर नाही ना, याबाबत तेथील नागरिक साशंक आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)