सहकार नगर – तळजाई वसाहत येथे लुकंड ट्रस्ट शाळे शेजारी वसाहत मध्ये बांधलेल्या समाज मंदिराच्या जागेत काही इसम अनधिकृत पणे वापर करत असून समाज मंदिरावर अनधिकृत मोबाईल टॉवर बांधून खाजगी व्यक्ती त्याचे भाडे घेत असल्याची तक्रार पर्वती मतदार संघातील एका नगरसेवकाने लेखी स्वरूपात दैनिक प्रभात कडे दिली आहे.
महानरपालिकेच्या निधी तून समाज मंदिर बांधण्याची कामे गेल्या काही वर्षांपासून परिसरात जोर धरत आहे मात्र अश्या समाज मंदिरात संबधित नगरसेवक यांचाच ताबा राहतो किंवा त्यांच्या जवळच्या लोकांना त्याचा वापर करण्यास मिळतो अशी स्थानिक नागरिकांची तक्रार आहे.
महानगरपालिकेच्या निधीतून बांधलेल्या समाज मंदिर वर मोबाईल टॉवर बांधण्यास कोणी परवानगी दिली त्यात कोणत्या कायदेशीर प्रक्रिया पार पडल्या. त्याचे भाडे कोण घेते, समाज मंदिरावर बांधलेले टॉवर सुरक्षित आहे का? असे अनेक प्रश्न उभे राहतात.
समाज मंदिरे मुक्त होणार का???
पर्वती मतदार संघात महानगपालिकेच्या विकास निधीतून किती समाज मंदिरे उभारण्यात आली ते कोणाच्या ताब्यात आहेत तेथे कोणता वापर केला जातो या बाबत चौकशी होणे गरजेचे आहे. भविष्यात गैरप्रकार थांबण्या साठी पालिकेच्या संबधित विभागाने वेळेत अंकुश ठेवणे गरजेचे आहे.
नागरिकांच्या कररूपी पैशातून बांधलेल्या समाज मंदिराच्या जागेचा कोण वापर करतो याची चौकशी होणे गरजेचे आहे अश्या प्रकारे मोबाईल टॉवर बांधण्याची परवानगी पालिका कशी देऊ शकते त्याचे भाडे कसे आणि किती येत आहे, सदर प्रकरणाची तातडीने कायदेशीर चौकशी होणे गरजेचे आहे.- सचिन देडे,
शिवसेना विभाग प्रमुख पर्वती मतदारसंघ
तळजाई वसाहत येथे लुकंड ट्रस्ट शाळे शेजारी वसाहत मध्ये बांधलेल्या समाज मंदिराच्या वर बांधलेल्या मोबाईल टॉवर बाबत चौकशी करून इतर माहिती घेऊन पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. – प्रज्ञा पोतदार, सहाय्यक आयुक्त सहकार नगर – धनकवडी क्षेत्रीय कार्यालय.