“मोबाइल टॉवर’च्या बॅटऱ्या चोरणाऱ्यांना “पोलिसी झटका’

लोणी काळभोर – पुणे व नजीकच्या जिल्ह्यात जिओ कंपनीच्या मोबाइल टॉवर केबिनमधून बॅटऱ्या चोरणाऱ्या दोन जणांना पोलीस झटका देत, जिल्हा ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. पुणे शहरासह, ग्रामीण भागात तसेच सातारा जिल्ह्यात केलेले एकूण 14 गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलीस पथकाने त्यांच्याकडून एक लाख रुपये किमतीच्या चार बॅटऱ्या हस्तगत केल्या आहेत.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहिती अशी की, याप्रकरणी इकबाल मनुलाल शेख (वय 46, रा. ऊरूळी कांचन, ता. हवेली) व इम्तीयाज कदीर शेख (वय 26, कागदीपुरा, कसबा पेठ, पुणे) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

अलीकडे काही महिन्यांपासून मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले आहे. 12 एप्रिलला लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे हद्दीतील थेऊर गावातील जिओ कंपनीचे मोबाईल टावरच्या कॅबिनेट मधून सहा लिथियम बॅटऱ्या चोरीस गेल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग संमातर तपास करीत असताना पथकाला मिळालेल्या बातमीनुसार त्यांनी इकबाल मनुलाल शेख याला ताब्यात घेऊन तपास केला असता त्याने इम्तीयाज कदीर शेख व सचिन दिलीप सापटे यांनी मिळून चोरी करून गुन्ह्यातील मालाची विल्हेवाट लावली, अशी माहिती दिली. यावरून त्या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी शिक्रापूर, लोणीकंद, लोणी काळभोर, इंदापूर, निगडी, हिंजवडी, खडक, निगडी, हडपसर, तळवडे, ताथवडे व सातारा जिल्ह्यातील लोणंद या 14 ठिकाणी गुन्हे केल्याचे कबुल केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.