पिंपरी – गहुंजे येथील क्रिकेट स्टेडियममध्ये आयपीएलची मॅच पाहत असताना एका तरुणीचा 90 हजार रुपयांचा मोबाइल फोन चोरट्यांनी लंपास केला. यासाठी गेलेल गहुंजे येथील क्रिकेट स्टेडियम मधून एका तरुणीचा 90 हजारांचा मोबाईल फोन चोरीला गेला. ही घटना शनिवारी (दि. 14) रात्री पावणे बारा वाजता घडली. पूनम शिवकुमार मिश्रा (वय 27, रा. लोहगाव वाघोली रोड, ता. हवेली) यांनी याप्रकरणी तेळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी या शनिवारी रात्री गहुंजे क्रिकेट स्टेडीयमवर आयपीएल क्रिकेट मॅच पाहण्यासाठी गेल्या होत्या. त्यांनी त्यांचा 90 हजार रुपये किमतीचा मोबाइल फोन त्यांचा मित्र सौरभ उमाशंकर मिश्रा यांच्या खिशात ठेवण्यासाठी दिला होता. गेट नंबर एकच्या समोर पार्किंगजवळ मोबाइल फोन चोरीला गेल्याचे उघडकीस आले.