मोबाईल गेमने ३९ वर्षाचा तरुण बनला अरबपती 

नवी दिल्ली – लहान मुलांपासून अबालवृद्धांपर्यंत मोबाईल गेम्स सर्वांनाच आवडते. आपण आपल्या फावल्या वेळेत हे गेम खेळतो. परंतु, हे गेम्स खेळल्याने अनेक व्यक्तीच्या अकाउंटमध्ये डॉलरही जमा होत असतात. ३९ वर्षाचे गैंग यी हेही त्यातीलच एका व्यक्ती आहेत. फ्री फायरच्या गेममुळे गैंग यी अरबपती झाले आहेत.

गैंग यी गेमिंग कंपनी सी लिमिटेडचे सहसंस्थापक आहेत. या कंपनीचा फ्री फायर गेम सध्या गेमिंग लव्हर्समध्ये मोठया प्रमाणात लोकप्रिय आहे. फ्री फायर गेमने लॉन्च झाल्यापासून अद्यापही गुगल प्ले स्टोरच्या टॉप ५ मध्ये आपली जागा कायम ठेवली आहे.फ्री फायरच्या डाऊनलोडर्सची संख्या वाढल्याने गैंग यी अरबपती बनले आहेत.

तसेच गैंग यीचे पार्टनर फॉरेस्ट ली यांची संपत्तीही कधीच १० आकडी झाली आहे. यामुळे गैंग यी आणि फॉरेस्ट ली आता गेमिंग क्षेत्राचे नवे अरबपती बनले आहेत. त्यांच्याआधी फोर्टनाइट निर्माते एपिक गेम्सचे फाउंडर टिम स्वीनेय आणि गाबे न्यूवेल हे अरबपती बनले आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here