मोबाइलचे कॉलदर वाढण्याची शक्‍यता

नवी दिल्ली – मोबाईल कंपन्या करीत असलेली गुंतवणूक व त्यांना मिळत असलेला महसूलात संतुलन नाही. त्यामुळे नजीकच्या भविष्यात मोबाईल कंपन्या कॉल आणि डेटाचे दर वाढू शकतात. 

यासंदर्भात ‘अर्नेस्ट अँड यंग’ या संस्थेने तयार केलेल्या अभ्यास अहवालात म्हटले आहे की, लॉक डाऊनच्या सुरुवातीच्या काळातच मोबाइल कंपन्या दरवाढ करण्याची शक्‍यता होती. मात्र लॉक डाऊननंतर कंपन्यांनी हा विचार पुढे ढकलला आहे. मात्र गुंतवणुकीच्या प्रमाणात महसूल मिळत नसल्यामुळे पुढील एक वर्षामध्ये या कंपन्या किमान दोन वेळा दरवाढ करण्याची शक्‍यता आहे असे या संस्थेचे वरिष्ठ अधिकारी प्रशांत सिंघल यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.