दबंग 3 च्या सेटवर मोबाईल बंदी

अभिनेता सलमान खानची मुख्य भूमिका असलेला दबंग फ्रेंचाईजीमधील तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहत्यांमध्ये या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता आहे. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे.

दरम्यान या चित्रपटात दिग्दर्शक, अभिनेता महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात ती सलमानच्या कॉलेज जीवनातील प्रेयसीची भूमिका पार पाडणार असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटातील सईचा लूक सर्वांपासून लपवून ठेवण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“दबंग 3′ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सईचा लूक लीक होऊ नये यासाठी मेहनत घेतली जात आहे. विशेष म्हणजे सलमानने सईचा लूक लीक होऊ नये म्हणून सेटवर मोबाईल फोनवर बंदी आणली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार चित्रीपटाच्या चित्रीकरणादरम्यान सईला सार्वजनिक ठिकाणी जाण्यासही बंदी आणली आहे. लवकरच सलमान स्वत: सईचा लूक सोशल मीडियावर शेअर करणार असल्याचे म्हटले जात आहे. चित्रपटाच्या सेटवर येण्यापूर्वी सर्वांचे मोबईल फोन जमा करण्यात येत असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभुदेवा करणार असून हा चित्रपट 20 डिसेंबर 2019 रोजी प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)