भाजपाकडे इच्छुकांची भाऊगर्दी

कोअर कमिटीत बाराही जागा लढवण्याची तयारी
प्रत्येक मतदारसंघात 10 ते 15 जण इच्छुक

नगर – विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने जिल्ह्यातील सर्व बारा मतदारसंघासाठी आज इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या.रात्री उशिरापर्यंत या मुलाखती सुरुच होत्या. या मुलाखतीसाठी इच्छुकांनी मोठी गर्दी केली होती. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रामदास आंबटकर यांनी या मुलाखती घेतल्या.

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड यांच्यासह भाजपाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. विद्यमान आमदार शिवाजी कर्डिले, मोनिकाताई राजळे,स्नेहलता कोल्हे,बाळासाहेब मुरकुटे,वैभव पिचड,राजेश परजणे,विजय वहाडणे आदींनी मुलाखती दिल्या.

तालुकानिहाय मुलाखती दिलेल्या इच्छुकांची नावे पुढीलप्रमाणे –

संगमनेर मधून – सुभाष गिते, ऍड रामदास शेजुळ, हरिभाऊ चकोर, राजेश चौधरी, महेश जगताप, भाऊसाहेब थोरात, तानाजी बागल, बाळासाहेब शेडगे, बाळासाहेब सागर, भानुदास डेरे, डॉ अशोक इथापे, सुधाकर गुंजाळ, भरत फटांगरे, सौ पूजा दिक्षित, वैभव लांडगे, अशोक कानडे, साईनाथ गोडगे, विठ्ठलराव शिंदे, विक्रमसिंह खताळ, एकनाथ नागरे. कोपरगावमधून – विजय वहाडणे, राजेश परजणे, प्रभाकर वाणी, प्रा सुभाष शिंदे, सोमनाथ चांदगुडे, सुभाष दवंगे, नामदेव जाधव, विनायक गायकवाड, राजेंद्र खिल्लारी. श्रीरामपूर मधून – नितीन उदमले, अशोक वाकचौरे, अशोक कानडे, भाऊसाहेब वाकचौरे, सतीश सौदागर, चंद्रकांत काळोखे, डॉ वसंत जमदडे, श्रीकांत साठे, सागर रंधवे, प्रा संतोष रंधवे, नितीन दिनकर, प्रकाश संसारे

शिर्डीतून – ना राधाकृष्ण विखे पा., नकुल कडू, ऋषिकेश खर्डे. नेवासा मधून – राजेंद्र निंबाळकर, एड संजीव शिंदे, अशोक ताके, अभिजीत लुणीया, सचिन देसरडा, रावसाहेब फुलारी. शेवगाव-पाथर्डीतून – आ मोनिका राजळे, बाळासाहेब ढाकणे, डॉ अजित फुंदे श्रीगोंदा मधून – बबनराव पाचपुते, राजेंद्र मस्के, संतोष लगड, दिलीप भालसिंग, पारनेर मधून- सुभाष दुधाडे, बाबासाहेब पोटघन राहुरी मधून – आ शिवाजीराव कर्डिले, सत्यजित चंद्रशेखर कदम, विक्रम तांबे, कर्जतमधून – पालकमंत्री प्रा राम शिंदे, नगरमधून – विजय दत्तात्रय देवापांडे, महेंद्र उर्फ भैया गंधे.

नगर – भारतीय जनता पार्टीच्या इच्छुकांच्या मुलाखती आज सुरू झाल्या असून सर्व विद्यमान आमदारांनी मुलाखती दिल्या आहेत. तसेच आगामी निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी कोर कमिटीची बैठक पार पडली असल्याची माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.

जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड म्हणाले की, आज इच्छुकांच्या मुलाखती सुरू झाल्या आहेत. विद्यमान सर्व आमदारांनी मुलाखती दिल्या आहेत. शिवसेनेबरोबर युती संदर्भातला निर्णय हा प्रदेश पातळीवर होणार आहे. मात्र भाजपाने जिल्ह्यामध्ये बाराही जागांच्या संदर्भात तयारी केली आहे.
याकरता कोअर कमिटीची बैठक सुद्धा आज सकाळी घेण्यात आली. या बैठकीला भाजपाचे खासदार सुजय विखे, सर्व आमदार, जिल्हाध्यक्ष, चार सरचिटणीस यांसह पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीमध्ये आगामी काळात निवडणुका कशा पद्धतीने लढवायच्या? कशा पद्धतीने निवडणुकीची तयारी करायची? यासंदर्भातला विषय घेण्यात आला आहे.

या निवडणुकीमध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय विस्तारक यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. साधारणत प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी निवडणूक होईपर्यंत एकेका मतदारसंघांमध्ये पूर्णवेळ काम करायचे असा निर्णय या बैठकीत झाला आहे. लवकरच त्याच्या नियुक्त्‌या केल्या जाणार असल्याचे जिल्हाध्यक्ष बेरड यांनी स्पष्ट केले.

भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्यामध्ये बूथ रचना तयार झाल्या आहेत. 3722 बूथ कमिट्या नियुक्त करण्यात आलेल्या आहेत. त्यांचा आढावाही घेण्यात आलेला आहे. विधानसभा निहाय कार्यकर्त्यांचे मेळावे घेणार असून लवकरच याची सुरुवात जिल्ह्यामध्ये होणार आहे. वरिष्ठ पातळीवरून भाजपाचे केंद्रीय समिती चे श्‍याम जाजू तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे हे या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत, असेही जिल्हाध्यक्ष बेरड यांनी स्पष्ट केले.

वाकचौरे, वहाडणेंचे निलंबन रद्दचा प्रस्ताव
भाऊसाहेब वाकचौरे व विजय वहाडणे हे दोघे आज या ठिकाणी आले असून त्यांनी पक्ष निरीक्षकांची भेट घेतली आहे. मात्र त्या दोघांनी मुलाखती दिलेल्या नाहीत, अशी स्पष्टोक्ती बेरड यांनी दिली आहे. त्यांचे निलंबन मागे घेण्यासाठी जिल्हा भाजपाच्यावतीने प्रदेशाला प्रस्ताव गेला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.