मनसेचे पुण्यात दोन दिवस ‘आत्मचिंतन’; अध्यक्ष राज ठाकरे साधणार पराभूत उमेदवारांशी संवाद

Updated On:
मनसेचे पुण्यात दोन दिवस ‘आत्मचिंतन’; अध्यक्ष राज ठाकरे साधणार पराभूत उमेदवारांशी संवाद

पुणे – विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. तर पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईत काही उमेदवार निवडून येण्याची अपेक्षा पक्षाला होती. आता पक्षाध्यक्ष राज ठाकरे मुंबई-ठाण्यापाठोपाठ पुणे शहर आणि पश्चिम महाराष्ट्रातील पराभूत उमेदवार, स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

पक्षाची पुढील भूमिका काय असावी, या बाबतही चर्चा होणार आहे. शहर पदाधिकाऱ्यांकडून या बैठकीचे नियोजन करण्यात आले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बुधवारी आणि गुरूवारी पुण्यात असून गुरूवारी ही बैठक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. लोकसभेला भाजपला जाहीर पाठींबा दिलेल्या मनसेकडून विधानसभा निवडणुकीत मात्र पुण्यात कोथरूड, खडकवासला, हडपसर आणि कसबा मतदारसंघात उमेदवार उभे केले होते.

मात्र, या सर्व ठिकाणी मनसेच्या उमेदवारांना पराभवाचा समाना करावा लागला आहे. काही मतदारसंघांत चांगली मते मिळाली आहेत. त्यातच आता राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूकांच्या पराभवाची कारणे लक्षात घेऊन पक्षाची पुढील दिशा ठरविण्यासाठी राज ठाकरे सर्व उमेदवार आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.

टॅग्स:

आणखी संबंधित बातम्या

Tejaswini Pandit Raj Thackeray Birthday Post: ‘तुमच्यासाठी राज ठाकरे नाव असेल, पण आमच्यासाठी'... तेजस्विनी पंडितच्या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा

2026-06-15 11:33:58

Tejaswini Pandit Raj Thackeray Birthday Post: ‘तुमच्यासाठी राज ठाकरे नाव असेल, पण आमच्यासाठी'... तेजस्विनी पंडितच्या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा

Sandeep Deshpande : "कुठल्या व्यक्तीने कुठल्या पदावर किती वर्ष काम केलं या पेक्षां किती चांगलं काम केलं हे महत्वाचं"

2026-06-11 10:48:47

Sandeep Deshpande : "कुठल्या व्यक्तीने कुठल्या पदावर किती वर्ष काम केलं या पेक्षां किती चांगलं काम केलं हे महत्वाचं"

MNS News : मनसेमध्ये उभी फूट? नेत्यांचा थेट राज ठाकरेंना इशारा

2026-06-10 20:06:39

MNS News : मनसेमध्ये उभी फूट? नेत्यांचा थेट राज ठाकरेंना इशारा

Badlapur News : भरधाव कारने मनसे पदाधिकाऱ्याला उडवलं; घटना सीसीटीव्हीत कैद, प्रकृती चिंताजनक

2026-06-09 11:03:33

Badlapur News : भरधाव कारने मनसे पदाधिकाऱ्याला उडवलं; घटना सीसीटीव्हीत कैद, प्रकृती चिंताजनक

Raj Thackeray: "सावरकरांचा उदोउदो करून त्यातून मतांची बेगमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी..."; राज ठाकरेंचे परखड विधान

2026-05-28 12:53:59

Raj Thackeray: "सावरकरांचा उदोउदो करून त्यातून मतांची बेगमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी..."; राज ठाकरेंचे परखड विधान