मुंबई : शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे उद्या अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यासाठी शिवसेनेकडून जोरात तयारी सुरु आहे. दरम्यान,आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर विरोधकांकडून त्यांच्यवर टीका करण्यात येत आहे. त्यातच आता मनसेनेही आदित्य ठाकरेंवर निशाणा साधत खोचक पद्धतीने दौऱ्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
मनसे नेते गजानन काळे यांनी या संबंधी एक ट्वीट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरुन टीका केली आहे. “अयोध्येला जाऊन रामलल्लाचे दर्शन घेऊन आल्यावर तरी यांचा ढोंगी हिंदुत्वावरुन असली हिंदुत्वाकडे प्रवास सुरू होवो.
अयोध्येला जाऊन रामलल्लाचे दर्शन घेऊन आल्यावर तरी यांचा ढोंगी हिंदुत्वावरुन असली हिंदुत्वाकडे प्रवास सुरू होवो…आणि औरंगाबादचे नाव संभाजीनगर होवो, मशिदीवरचे भोंगे उतरो आणि रस्त्यावरचा नमाज बंद करण्याचे धाडस यांच्यात येवो…
विधानपरिषदेत तरी MIM व सपाची मदत न घेण्याची सुबुद्धी मिळो.— Gajanan Kale (@GajananKaleMNS) June 14, 2022
औरंगाबादचे नाव संभाजीनगर होवो, मशिदीवरचे भोंगे उतरो आणि रस्त्यावरचा नमाज बंद करण्याचे धाडस यांच्यात येवो. विधानपरिषदेत तरी एमआयएम व सपाची मदत न घेण्याची सुबुद्धी मिळो,” अशा खोचक शुभेच्छा गजानन काळे यांनी दिल्या आहेत.
आदित्य ठाकरे १५ जून रोजी सकाळी ११ वाजता लखनऊ विमानतळावर उतरतील. त्यानंतर दुपारी १.३० वाजता ते अयोध्येमध्ये जातील. आदित्य ठाकरे यांच्यासोबत अयोध्येला जाण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक उत्तर प्रदेशकडे निघाले आहेत. याठिकाणी दुपारी ३.३० वाजता ते पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.