मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्मान सेना विधानसभा निवडणुकीत 200 ते 225 जागा लढवणार आहे अशी माहिती मनसे नेते प्रकाश महाजन यांनी दिली आहे.
काय म्हणाले प्रकाश महाजन?
राज ठाकरेंनी पर्वा आमच्या मेळाव्यात जाहीर केलं की आपण 200 ते 225 जागा लढवू. हा निर्णय जर साहेबांनी घेतला असले तर आम्ही कार्यकर्ते त्या दृष्टीने तयार आहोत असे प्रकाश महाजन म्हणाले आहेत.
राज ठाकरे विधानसभा निवडणुकीसाठी आढावा घेणार
राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा दिला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुती अपयशी ठरली होती. विधानसभा निवडणुकीत मनसे स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. मनसेने विधानसभेसाठी 200-225 जागांची तयारी करायला सुरुवात केलेली आहे. चाचपणी केलेल्या नेत्यांकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रत्येक मतदारसंघाचा आजपासून पुढील काही दिवस आढावा घेणार आहेत.