मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून हजारोंच्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संपूर्ण राज्यात लॉकडाऊनचा लागू करण्याबाबतचा इशारा दिला आहे.
लोकांनी नियमांचं पालन केलं नाही तर पुढच्या दोन दिवसात लॉकडाऊनबाबत निर्णय घेऊ, अशा शब्दात त्यांनी इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी राज्यातील सरकारवर टीका करणाऱ्या अनेकांचा समाचार घेतला. याच दरम्यान त्यांनी मास्क न वापरण्यात कसलं शौर्य? असेही ते म्हणाले. असं म्हणत त्यांनी मनसेलाही टोला लगावला. यावर आता आज मनसेही लाईव्हच्या माध्यमातून उत्तर देणार आहे.
मुख्यमंत्री साहेब, तुमचं ऐकलं, आता आमचं ऐका…किंबुहना ऐकाच ! उद्या सकाळी 11 वाजता फेस बुक लाईव्ह.
Sandeep Deshpande Adhikrut
या फेसबुक पेजवर— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 2, 2021
काय आहे मनसेचे नेते संदीप देशपांडे ट्विट
”मुख्यमंत्री साहेब, तुमचं ऐकलं, आता आमचं ऐका…किंबुहना ऐकाच ! उद्या सकाळी 11 वाजता फेसबुक लाईव्ह.”, असे ट्विट देशपांडे यांनी केलंय. म्हणजे, मुख्यमंत्र्यांच्या भाषेचा आपल्या ट्विटमध्ये उल्लेख करत, त्यांनी 11 वाजता फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून उत्तर देणार असल्याचं सूचवलं आहे.