शिवसेना-भाजपचा पराभव करण्यासाठी मनसेलाही सोबत घ्यावे !

– अजितदादा पवार यांचा प्रस्ताव

– 44 जागांचे वाटप पूर्ण

मुंबई- शरद पवार यांच्या विरोधानंतरही शिवसेना-भाजपाचा पराभव करण्यासाठी मनसेलाही बरोबर घेतले पाहिजे, अशी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी भूमिका मांडली आहे. मात्र आपले हे व्यक्तिगत मत असल्याचे ते म्हणाले. राजू शेट्टी यांचे काही गैरसमज झाले असतील तर ते दूर करून त्यांनाही बरोबर घेतले जाईल असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

44 जागांची चर्चा पूर्ण !
आघाडीबाबत अंतिम निर्णय लवकरच घेतला जाईल. कॉंग्रेसबरोबर 44 जागांची चर्चा झाली आहे. अन्य पक्षांशी चर्चा करून उर्वरित जागांबाबत निर्णय घेतला जाईल. राजू शेट्टी यांचे काही गैरसमज झाले असतील तर ते दूर केले जातील. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी 14 तारखेला महत्वाची बैठक बोलावली असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी बारामती जिंकण्याबाबत केलेल्या वक्तव्याची अजित पवार यांनी खिल्ली उडवली. त्यांचे वक्तव्य म्हणजे पोरकटपणा आहे. केवळ बोलून जागा निवडून येत नाही. मुख्यमंत्री सुसंस्कृत आहेत त्यामुळे ते 43 च काय सर्व 48 जागा जिंकून येतील असंही म्हणतील असा टोला अजित पवार यांनी लगावला.

विरोधी पक्षाच्या आघाडीत मनसेला घेण्यास कॉंग्रेसने प्रथमपासूनच विरोध केला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मनसेला आघाडीत घेतले जाणार नाही, असे स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी मात्र शिवसेना-भाजपाच्या पराभवासाठी सर्व पक्षांनी एकत्र येण्याची आवश्‍यकता असून यासाठी मनसेला बरोबर घेतले पाहिजे अशी भूमिका घेतली. शिवसेना-भाजपात सध्या रस्सीखेच सुरु आहे. पण वेगळे-वेगळे लढल्यास मोठा फटका बसेल. याची जाणीव दोन्ही पक्षांना असल्याने शेवटी त्यांची युती होणार हे नक्की आहे. त्यामुळे त्यांचा पराभव करण्यासाठी सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येणे आवश्‍यक आहे.

मनसेने पूर्वीच्या निवडणुकीत मनसेने एकेका मतदारसंघात लाख-दीड लाख मतं घेतली आहेत. त्यांच्या भूमिकेतही बदल झाला आहे. ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू हे सुद्धा पूर्वी “एनडीए’ मध्ये होते व आत्ता विरोधी पक्षांबरोबर आले आहेत. राज ठाकरे हे मध्यंतरी उत्तर भरतीयांच्याही व्यासपीठावर गेले होते. त्यामुळे त्यांना सोबत घेण्यात कोणतीही अडचण नसल्याचे निदर्शनास आणताना, मतभेदाचे मुद्दे बाजूला ठेवून धर्मनिरपेक्षतेचे तत्व मान्य असणाऱ्या सर्व पक्षांनी एकत्र आले पाहिजे, असे आपले मत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)