‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत मोदी सरकारच्या ‘आर्थिक पॅकेज’वर मनसेची खोचक टीका

मुंबई  – मोदी सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजबाबत सर्व स्थरातून तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी नरेंद्र मोदी यांचा एका सभेतला व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.

यामध्ये नरेंद्र मोदी म्हणतात की, आता पॅकेज घोषीत करण्याची एक फॅशन झाली आहे. आतापर्यत इतके आर्थिक पॅकेज जाहिर करण्यात आले आहे. मात्र तुम्हाला काही आतापर्यत काही मिळालं आहे का असा सवाल नरेंद्र मोदी सभेतील उपस्थित असणाऱ्या लोकांना विचारतात, असं या व्हिडिओमधून दिसून येत आहे. पॅकेज फक्त घोषित करण्यात येतं, मात्र हे लोकांपर्यंत पोहचत नाही, असं नरेंद्र मोदी या व्हिडिओमध्ये बोलत असल्याचे दिसून येत आहे. संदीप देशपांडे यांनी हाच मुद्दा पकडत कधी खरं बोलतात, कधी खोटं बोलतात समजतच नाही, असं म्हणत व्हिडिओ ट्विट केला आहे.

तत्पूर्वी,  मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी २०१९च्या लोकसभेच्या निवडणुकीत ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. राज ठाकरेंनी लोकसभेची निवडणूक न लढता राज्यभर अनेक सभा घेत मोदी सरकारवर टीका केली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.