मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नुकतेच पहिले अधिवेशन पार पडला. त्यात मनसेने कात टाकत आपल्या पक्षाची नव्याने ध्येयधोरणे ठरवत पक्षाचा झेंडादेखील बदलला. पक्षाचा झेंडा बदलल्यानंतर मनसेवर हिंदुत्वाच्या वाटेवर जात असल्याची टीका करण्यात येत आहे. विचार उसना असला तरी हिंदुत्वाचाच आहे. झेपेल तर पुढे जा असे म्हणत शिवसेनेने राज ठाकरे यांच्यावर सामनाच्या अग्रलेखातून जोरदार टीका केली आहे.
आधुनिक अफजल खानानी मराठी आणि हिंदूंच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. नेमकं त्याच गोष्टीवर राजसाहेबांनी बोट ठेवल्यामुळे झालेले जुलाब सामन्याच्या अग्रलेखातून बाहेर पडत्यात. काळजी करू नका आम्हीच उपचार करू.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) January 25, 2020
दरम्यान, शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून राज ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर निशाणा साधला आहे. शिवसेनेनं केलेल्या टीकेवर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला सडतोड उत्तर दिलं आहे. ट्वीट करत संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला सुनावलं आहे की,’आधुनिक अफजल खानने मराठी आणि हिंदूंच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. नेमकं त्याच गोष्टीवर राजसाहेबांनी बोट ठेवल्यामुळे झालेले जुलाब सामन्याच्या अग्रलेखातून बाहेर पडत आहेत. काळजी करू नका आम्हीच उपचार करू.’